Welcome...

कुडाळदेशकर आद्यगौड ब्राम्हण समाज, त्यांचा इतिहास, परंपरा, दैवते इ बाबत एक मध्यवर्ती पोर्टल असणे अत्यावश्यक आहे. कुडाळदेशकरांच्या अशा काही साइट्स आहेतही. पण अशा प्रकारचे पूर्ण समजाबाबत माहिती देणारे पोर्टल बनवणे हे एका व्यक्तिचे काम नाही. एका व्यक्तिने किंवा संस्थेने अशा प्रकारचे काम केल्यास त्यात अनेक तृटी राहतात व नंतर ते सातत्याने अपडेट राखणे देखील कठीण होत जाते. म्हणूनच कुडाळदेशकरांसाठी "मध्यवर्ती क्राऊडसोर्स पोर्टल"ची ही रचना केली आहे. सदर साइटवर आमच्याकडे असलेली माहिती व फोटो सातत्याने अपलोड करणारच आहोत. पण आपल्यापैकी कुणीही ह्या पोर्टलवर सभासद होऊन ह्या कार्याला हातभार लावू शकेल.